previous arrow
next arrow
Slider

कसे पोहोचाल?

महामार्ग
आंगणेवाडी , मालवण ,जिल्हा -सिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६ ने प्रवास करू शकता .जो कणकवली ,कसल व बेळेना या तीन मुख्य मार्गानी जोडलेला आहे .पनवेल ते आंगणेवाडी अंतर साधारण ५१५ कि.मी आहे . 

लोहमार्ग
आंगणेवाडी येथे पोहोचण्यासाठी आपण कोकणरेल्वे लोहमार्ग वापरून मुख्य रेल्वेस्थानक कणकवली,सिंधुदुर्ग ,कुडाळ व सावंतवाडी यापैकी कोणतेही स्थानक वापरून प्रवास करू शकतो. भराडी देवीचे मंदिर सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकापासून १४-१५ कि.मी. अंतरावर आहे .

हवाई मार्ग
आंगणेवाडी  येथे पोहोचण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करून  मालवण चिपी, रत्नागिरी,गोवा किवा बेळगाव येथून विमानप्रवास करू शकतो. भराडी देवीचे मंदिर ते चारही विमानतळ साधारण  २० ते १५० कि.मी.वर आहेत .