previous arrow
next arrow
Slider

वार्षिक उत्सव दिवस

 आंगणेवाडीची भराडीदेवी हि नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्द आहे .या संदर्भात काही मंडळींशी संपर्क .साधला असता ते म्हणाले ,हा प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेचा मुद्दा आहहे .अनुभूती घेणे ही वैयत्तिक पातळीवरची गोष्ट असून त्याबाबत दुसऱ्याचे मत घेणे निरूपयोगी आहे .या देवीचे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सर्व बाजूनी झाडे -झुडपे असून सरपटणाऱ्या प्राणांचा वावर असतो .जर्तेच्या वेळी या मोकळ्या माळावर लोक पथारी टाकतात ; परंतु या लोकांना कोणत्याही सरपटणाऱ्या प्रणयाचा आजपर्यंत दंश झालेला नाही.हे या देवीची भाविकांना लाभलेले संरक्षण कवच आहे ,असे म्णह्टल्यास वावगे ठरू नये .एवढेच नव्हे तर देवीच्या मंदिरात अथवा नजीकच्या परिसरात चोऱ्यामाऱ्याही होत नाहीत .चोरांच्या मनात या देवीच्या दैवी सामर्थ्याची भीती असते .जत्रेच्या वेळी एखाद्याने मोहात पडून चोरी केलीच तर त्याला मंदिर परिसरातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही .तो त्याच परिसरात उलट-सुलट फिरत राहतो.चोरलेली वस्तू जोपर्यंत तो पुजारी किंवा व्यवस्थापक मंडळींकडे परत करीत नाही किंवा पच्छातापची भावना त्याच्या मनात निर्माण होत नाही तो पर्यंत तो असाच फिरत राहतो.त्यामुळे या जत्रेला येणारे सर्व भाविक निःशंकपणे येत असतात .

साधारण ५०-६० वर्षांपूर्वीचा काळ असा होता कि, डोंगर-घाट्या आणि नद्या पार करून पायी आंगणेवाडीला लोक पोहोचायचे .केवळ मालवणच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाच अशा विविध दैवतांचे वस्तीस्थान आहे .कुणकेश्वर , आचऱ्याचा रमेवश्वर ,अरवलीच्या वेतोबा ,कोकीसऱ्यांची महालक्ष्मी, मुंग्यांची भगवती ,सोनुर्लीची माउली ,आंगणेवाडीची भराडीदेवी अशी कितीतरी नावे सांगता येतील .भाविकांचे कल्याण करणारी हि आदिमाता होय .हि दैवी सर्व स्वरूपिणी ,सकाळ सौभाग्य दयानी , सर्व सिद्धी प्रदायिनी अशी आहे .मसुऱ्यातील रमाई नदीच्या पाण्यामुळे गावकरी दुबार पिके घेत असतात .त्यामुळे जवळ -जवळ १२ महिने सर्वत्र हिरवीगार शेती व नारळीच्या रांगा यामुळे या गावाला आगळीच शोभा येते .६०-७० वर्ष पूर्वी सोने ७०-७५ रुपये टोला असावे .भराडीच्या जत्रेवेळी त्याकाळी सोन्याच्या कणांची पुदी विकण्यात येत असे.त्याला लेणे असे म्हणतात .सोन्याचा लहानसा तुकडाही कागदाच्या पुडीतून विकला जात असे .सोने ,चांदी किंवा तांबे त्याच्या पुड्या देवीला त्याकाळी वाहत असत .दैवी माउली ,दैवी सातेरी व दैवी भराडी या मसुरे गावाच्या प्रमुख देवता आहेत. या देवतांकडून मसुरे गावाला संरक्षण लाभलेले आहे. हिंदू ,ख्रिश्चन आणि मुसलमान आदी सर्व धर्माची लोक या जत्रेत सहभागी होतात.

जत्रेच्या दिवशी भराडी देवीच्या स्वयंभू पाषाणाला मुखवटा घालून साडी चोळी नेसवली जाते ,तसेच अलंकारही घातले जातात .देवीची ओटी साधारणपणे खान ,नरलमसोन्या -चांदीची नाणी अशा स्वपरुपात भरली जाते.सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू असतो .रात्री सुमारे ८ वाजता हा कार्यक्रम बंद झाल्यावर आंगणेवाडीतील प्रत्येक घरातील स्त्री अंघोळ करून कोणाशी ही न बोलता व कोणालाही स्पर्श न करता जेवणं करण्यास सुरवात करते .हाच प्रसाद देवीला रात्री नैवैद्य म्हणून दाखवतात .प्रसादात भात,पाच प्रकारच्या भाज्या , वडे ,कलावाटण्याचा सांबर यांचा समावेश असतो .त्या महिलांबरोबर आंगणे पुरुष मंडळी हातात पेटत्या मशाली घेऊन त्यांना वाट दाखवित असतात .देवीला नैवैद्य दाखवून परत आल्यानंतर स्त्रियांच्या ताटातील हा प्रसाद भाविकांसाठी उधळण्यात येतो .देवीच्या महाप्रसादाचा हा सोहळा पार पडल्यानंतर सकाळपर्यंत मंदिराचा दरवाजा बंद असतो .देवीचे धार्मिक विधीच फक्त चालू असतात .त्यानंतर जवळ-जवळ २-३ वाजण्याचा सुमारास देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु होतो.हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालू असतो .फार पूर्वीपासूनच मसुरे गावाला अध्यात्माचा वारसा लाभलेला आहे .टेंबेस्वामी, बागवे महाराज , पाचलेगावकर महाराज ,भालचंद्र महाराज आदी अनेक संत महात्म्यांनी या गावात वास्तव केले होते असे म्हणतात .या महाप्रसादाचा सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फिटून जाते .
जत्रेच्या दिवशी पहाटेपासून मंदिरासमोर भाविकांच्या प्रचंड रांगा देवीच्या दर्शनासाठी लागलेल्या असतात .शिस्त म्हणून स्त्री आणि पुरूष यांच्या स्वतंत्र रांगा असतात .देवीला वाहिलेलं हिरवे खान मंदिराच्या गाभाऱ्यात इत्रत विखुरलेलं असतात ;पण त्यापैकी कोणीही काहीही स्वतःसाठी उचलून नेत नाही .हे सर्व खण जत्रौउत्सवासाठी किंवा देवीच्या मशाली साठी वापरले जातात असे म्हणतात .ये जत्रेला येणाऱ्या भाविकांची सेवा करणे म्हणजेच भराडीदेवीची सेवा करणे ,असे आंगणेवाडीकर म्हणतात .
या जत्रौउत्सवात दुकानांची संक्या १० हजारांवर असते ,जवळ जवळ डिड किलोमीटर परिसरात ही दुकाने थाटलेली असतात .जत्रेपूर्वी आठवडाभर अगोदर पासूनच भाविकांचे थवेच्या थवे आंगणेवाडी कडे येऊ लागतात .स्थानिक ग्रामस्थ शिस्तबद्ध पद्धतीने यात्रेचे नियोजन करतात ;तसेच शासकीय पातळीवरूनही त्यांना साह्य केले जाते.जत्रेत शांतात राहावी म्हणून कडक पोलीस बंदोबस्त असतो.स्थानिक ग्रामस्थ व आंगणेवाडी विकास मंडळ,मुंबई यांच्या मार्फत मंदिराच्या जिर्णोउद्धाराचे काम सध्या सुरु असून गुजरात, राजस्थानातील ख्यातनाम कारागीर या मंदिराच्या उभारणीसाठी झटत आहे.मंदिर अँड जत्रेच्या निमित्ताने ; तसेच जिरनोधारचा एक भाग म्हणून मंदिर समोर एक भव्य खुला रंगमंच उभारण्यात आला आहे .त्याचप्रमाणे सर्व सोयीसुविधांयुक्त धर्मशाळा उभारण्याचा संकल्प आहे.पाणीपुरवठा साठी एक योजना ही आखलेली आहे .येथे एक बालवाडीही पूर्वीपासून सुरु आहे .अशा अनेक लोकउपयोगी कामे आंगणेवाडीकर करत असतात .आंगणेवाडी येथे कोणीही ग्रामस्थ स्वतंत्रपणे श्रे सत्यनारायणाची पूजा घालत नाही ,असे कळते .तर तेथील सर्व ग्रामस्थांच्या श्री सत्यनारायणाच्या पूजा श्रे देवी भराडी देवीच्या मंदिरात बांधण्याची परंपरा आजही अढळ राखण्यात आलेली आहे .या जत्रेच्या वेळी केले जाणारे नवस भाविक आपापल्या कुवतीप्रमाणे फेडतात .त्यामध्ये तेथिल मानकरी अथवा प्रमुख मंडळी यांची कोणतीही अपेक्षा नसते .
साधारणपणे देवदिवाळी पासून या जत्रेच्या तयारीला सुरवात होते .देवीच्या मंदिरात "डाळप" बसते.त्यानंतर शिकारीला जाणयासाठी देवीकडे कौल मागितला जातो .कौल मिळाल्यानंतर शिकारीचा दिवस नाकी होतो.सर्वजण शिकारली मोठया उत्साहाने जातात .त्यानंतर दुपारची शिकार करून आनंदउत्सव साजरा करण्यात येतो .शिकार केलेल्या डुकराची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते.तसेच शिकाऱ्याला ही मोट मन देण्यात येतो .या शिकारी नंतर डाळप उठते .त्याचवेळी जत्रेचा दिवस ठरवण्यासाठी देवीला कौल मिळताच जत्रेची तारीख निश्चित होते .या तारखेत नंतर कोणता ही बदल केला जात नाही .
जत्रेच्यावेळी प्रथम गावकऱ्यांमार्फत देवीची ओटी भरण्यात येते .ङ्गणेवाडीतील ग्रामस्थ देवीची पूजा करतात अँड नंतर जातेला प्रारंभ होतो.मग जत्रेमध्ये विविध विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते.याच जत्रेच्या वेळी मिरजेहून आलेल्या गोंधळ्यांचा कार्यक्रम होतो .हे गोंधळी प्रत्येक जत्रेला खास करुनयेत असतात .जत्रेचं दुसऱ्या दिवसाला "मोड जत्रा " म्हटले जाते .या दिवशी आवराआवर करून व्यापारी आपापल्या घरी परतू लागतात .या जत्रेत शेतीची अवजारे माफक किमतीत मिळत असल्याचे सांगितले जाते.त्यामुळे विशेषतः शेतकऱयांची गर्दी अधिक असते .जत्रेची सांगता ब्रह्मणाद्वारेविधिपूर्वक करण्यात येते .
या जत्रेबाबत असे म्हणतात कि, पोलिसांना "वॉन्टेड " असलेली परुंतु भराडीदेवीचा भक्त असलेली व्यक्ती पोलिसांना सापडत नाही .ही देवी आपल्या भक्ताला पाठीशी घालते .नाहीतरी म्हण्टलेच आहे ना "देव भक्तीचा भुकेला असतो " नाग त्या भक्ताला तो "वॉन्टेड" असला तरी देवी वाचविणारच.
या देवीच्या छायाचित्रासंबंधी असा प्रघात आहे कि, देवीशी छायाचित्र कोणीही छापू नये.खुद्द आंगणेवाडीतील कोणाच्याही घरी देवीचे छायाचित्र सापडणार नाही.त्यामुळे देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन किंवा तिची मनोमन स्मृती उभी करून या देवीची करुणा लाभावी लागते.
जत्रेच्या दिवशी सकाळी सूर्यदयानंतर नाभिक हातात आरसा घेऊन मंदिराच्या दरवाजासमोर उभा राहतो ,या आरशाने सूर्याची किरणे देवीच्या मुखकमलावर पडतात.तेव्हा देवीची प्रारंभाची पूजा होते आणि नंतर आंगणेवाडी ग्रामस्थ पूजा होऊन जत्रेला सुरुवात होते.

--सौजन्य -चैत्रपालवी वासंतिक विशेषांक २००३- श्री .विश्वनाथ मोरे