previous arrow
next arrow
Slider

पौराणिक कथा

मुंबईतील चाकरमानीच नवे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो मंडळी आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या जत्रेला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतात.

भक्तांचा लोंढाच लोंढा आंगणेवाडीकडे सरकत असतो. ज्यांना जसे सोपे वाटेल तसे लोक तिकडे जातात.काही मंडळी मुंबईहून रेल्वेने किंवा बसने कणकवलीला जातात.कणकवलीहुन माञ आंगणेवाडीपर्यंत एस.टी ने खास व्यवस्था केलेली असते.


मालवण आणि कणकवली या दोन एस.टी डेपोच्या किमान १०० ते १५० गाड्या केवळ या जत्रेसाठी तैनात केल्या जातात.या खेरीज खाजगी वाहनांची संख्याही खूप असते.साधारण १०० वर्षांपूर्वी या एस.टी बसेस व खाजगी वाहनांच्या ऐवजी शेकडो बैलगाड्या धावताना दिसायच्या असे जुने जाणकार लोक सांगत.
मालवण ,कणकवली या मार्गावरून दोन फाटे आंगणेवाडीकडे जातात.मालवणहून निघाल्यानंतर वाडीचा थांबा सोडल्यावर माळरानावर डाव्या हाताला तांबड्या मातीचा रस्ता दिसतो.आंगणेवाडी असा छोटासा फलकही थेथे आहे.हा रस्ता थेट मंदिरा जवळ जातो. दुसरा रस्ता बागायत या बस स्थानकाला जातो.जत्रे व्यतिरिक्त इतरवेळी राहण्याची किंवा हॉटेलची व्यवस्था या परिसरात पुरेशी नाही.या जत्रेच्या निमित्ताने एस.टी महामंडळाला फार मोठे उत्पन्न उपलब्ध होते.या जत्रेला एवढ्या मोठ्या संख्येने भाविक जमतात कि डोळ्यांचे पारणे फिटून जाते.
आंगणेवाडीची भराडी देवी हि देवी सातेरी व देवी माउलीचे तिसरे रूप समजले जाते ;तसेच टी तुळजापूरच्या भवानी मातेच्या अंश असल्याचे मानले जाते .हे मंदिर पर्यटन स्थळ म्हणून करण्यास किंवा ट्रस्ट स्थापन करण्यास स्थानिक मंडळींचा विरोध आहहे.हे सर्व झाले कि , या स्थळाचे यांत्रिकरण होईल .या स्थळाला आम्हाला बाजरी स्वरूप द्यावयाचे नाही.देवीच्या दैवी शक्तीला बाधक ठरणाऱ्या कोणत्याही सुधारनांशी आम्ही सहमत नाही ,असे आंगणेवाडीकरांचे म्हणणे आहे .


अलोट गर्दीची व कोट्यवधी रुपयांची उलाढालची आंगणेवाडीचीही जत्रा जगप्रसिद्ध आहे.या गावातील माहेरवाशीण लग्न होउन जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी टी या जत्रेला आवर्जून उपस्थित राहते.या देवीची जत्रा फार पूरतान काळापासून सुरु असल्याचे म्हंटले जाते,अशी हि भराडी देवीची जत्रा नेमकी आहे तरी काय? हि जत्रा साधारण कधी पासून सुरु झाली आणि थेथे नेमके होते तरी काय ? अशा अनेक मुद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असे आढळून आले की, सर्व साधारण ३०० वर्षांपासून भाविकांनी या देवीची पूजा अर्चा करण्यास सुरुवात केली.आत्ता अनेकांना या देवीच्या जागृतीची प्रचीती आलेली आहे.नवसाला पावणारी भराडीदेवी म्हणून या देवीचा नावलौकिक सर्व दूर झालेला आहे.देवीच्या जागृतेच्या महिम्यामुळे यात्रेसाठी दार वर्षी लाखो भाविक आंगणेवाडीला जमू लागले.
मालवण तालुक्यापासून सुमारे १५ कि.मी अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी हि एक वाडी;पण भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे गावाचं असल्याचा समाज सर्व सामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे.देवीच्या माहात्म्यमुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झाले असून या ठिकाणी बहुसंख्या लोकांची वस्ती अंगणे आडनावाच्या लोकांची आहे.हे श्रद्धा स्थान केवळ अंगण्याचेच नव्हे तर अन्य असंख्या भाविकांचे झाले आहे.देवीच्या मंदिर खर्चासाठी पेशवे चिमाजी अप्पा यांनी इनाम म्हणून २ हजार एकर भरड व शेत जमीन दिली .अशी या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते .

आंगणेवाडीतील भरडावर हि स्वयंभू पाषाणरूपी देवी प्रकटली.म्हणून तिला भराडीदेवी म्हणतात .तिची पूजा -अर्चा सुरु जहाल आणि हि देवी भाविकांना पावू लागली.या देवीची ख्याती आता तर अगदी दूरवर पसरलेली आहे.हि जत्रा नेमकी कधीपासून सुरु झाली त्यासंबंधी कोणीही माहिती देत नाही.या देवीच्या प्रकटीकरण्याला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास असल्याचे म्हटले जाते ,तथापी निश्चित स्वरूपाची माहिती कोठेही मिळत नाही.


आंगणेवाडीतील बऱ्याच व्यक्ती नोकरी अथवा व्यवसायच्या निमित्ताने कोकणाबाहेर विशेषतः मुंबई येथे असतात .आंगणेवाडीचे क्षेत्रफळ साधारण ५३८.०२ हेक्टर म्हणजे सुमारे ८०० एकर एवढे आहे .आंगणेवाडीच्या एकूण क्षेत्रफळापैकी साधारण १८.४२ हेक्टर जमीन जंगल संपत्ती खाली असून १६१.९१ हेक्टर जमिनीवर केली जाणारी शेती हि पावसावर अवलंबून असते .१९९१ च्या जनगणने नुसार या ठिकाणी ७७ घरे आणि त्यामध्ये १३५ पुरुष अँड १४८ महिला होत्या.साधारण २०-२५ वर्षा पूर्वी यात्रेसाठी सुमारे २० हजार भाविक जमायचे.त्यापूर्वी २०-३० वर्षात सुमारे १० हजार लोकांची उपस्थिती असायची.हि संख्या दरवर्षी वाढत जाऊन आत सुमारे १५ लाख लोक जमतात .या मंदिराचा जीर्णोद्धाराचा आरखडा सुमार २२ लाख रुपयांचा असून सुमारे ८-९ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत .आंगणेवाडी जत्रौउत्सवात ग्रामस्थांमधील नाट्य कलावंत नाटके सादर करतात.या आंगणेवाडी नाट्य मंडळाची स्थापना १९६४ मध्ये झाल्याचे कळते .आंगणेवाडीतील एक सामाजिक कार्यकर्ते कै.दत्ता अंगणे हे या नाट्य मंडळाचे संथपक सदस्य होते.आंगणेवाडी वाचनायलची स्थापना १५ जानेवारी १९५७ रोजी झाली .या वाचण्यालायचे संस्थापक अध्यक्ष गोपालकृष्ण अंगणे हे होते .या वाचनालयात मराठी , हिंदी इंग्रजी अशी विविध प्रकारची सुमारे ४-६ हजारांच्या दरम्यान पुस्तके असून विविध दैनिक अँड साप्ताहिक येथे उपलबध आहेत .सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे कडून अनुदान ,मसुरे ग्रामपंचायत कडून आर्थिक सहाय आणि ग्रामस्थांकडून देणग्या द्वारे वाचनायालयाचा खर्च चालविला जातो.

आंगणेवाडी ग्रामस्थांचे वर्क भजनी मंडळ असून दार मंगळवारी सायंकाळी देवीच्या मंदिरात भजन करण्यात येते .सर्व गाव मंदिरातील भजनात सहभागी असते.गणपती दिवस तेवढे आंगणेवाडीकरांच्या घरात भजन होते , एरवी हे भजन देवीच्या मंदिरातच होते .
या देवी संबंधी अनेक आख्यायिका प्रचिलित आहे .असे म्हणतात कि, आंगणेवाडीतील एकजण चिमाजी अप्पा यांच्या सेवेत गुप्तहेराचे काम करत असे .त्याच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन देवी तुळजाभवानी माता आंगणेवाडीच्या भरडावर अवतरली.हि देवी या अंगणे नामक पुरुषला दिसली नाही ;परुंतु त्याच्या गाईने हि पाषाणरूपी देवी दाखवून दिली .

आंगणेवाडी ग्रामस्थांचे वर्क भजनी मंडळ असून दार मंगळवारी सायंकाळी देवीच्या मंदिरात भजन करण्यात येते .सर्व गाव मंदिरातील भजनात सहभागी असते.गणपती दिवस तेवढे आंगणेवाडीकरांच्या घरात भजन होते , एरवी हे भजन देवीच्या मंदिरातच होते .


या देवी संबंधी अनेक आख्यायिका प्रचिलित आहे .असे म्हणतात कि, आंगणेवाडीतील एकजण चिमाजी अप्पा यांच्या सेवेत गुप्तहेराचे काम करत असे .त्याच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन देवी तुळजाभवानी माता आंगणेवाडीच्या भरडावर अवतरली.हि देवी या अंगणे नामक पुरुषला दिसली नाही ;परुंतु त्याच्या गाईने हि पाषाणरूपी देवी दाखवून दिली .
अशा जत्रा महाराष्ट्रात आणि देशातही टिक ठिकठिकाणी भारतात.त्यांच्या तारखाही निश्चित असतात असे आपल्याला माहित आहे ;परंतु भराडीदेवीच्या जत्रेची तारीख निश्चित नसते .महाराष्ट्राच्याच नवे तर आजूबाजूच्या राज्यांच्या कानाकोपऱ्यातून लहानापासून थोरांपर्यंत अनेक भाविक या जत्रेला येतात.फार वर्षांपूर्वी या जत्रेचे स्वरूप वेगेळे होते.आता ते बदलले आहे .सध्याचा जमाना श्रद्धा -अंधश्रद्धा यांच्यावरील वादाचा असला तरी आंगणेवाडीच्या जत्रेला येणारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.भराडीदेवी मुळेच या आंगणेवाडीच्या नावाचा प्रचार ,प्रसार सर्व दूर झाला .हि एक ते दीड दिवसाची जत्रा वर्षातून एकदाच येते .त्यामुळे मुंबईकर चाकरमानी झाडून जत्रेला येतात.


आंगणेवाडीची भराडीदेवी हे कोकणातील जागृत देवस्थानांपैकी एक मानले जाते.यंदा दि.2 मार्च  2024  रोजी या देवीची जत्रा आंगणेवाडी येथे भरणार आहे .आंगणेवाडीकरांच्या दृष्टीने या जत्रेला आणि दिवसाला फार मोठे महत्वाचे स्थान आहे.या देवीचा जत्रेचा दिवस देवीच्या कौलावर अवलंबून असतो. साधारणपणे पौष किंवा माघातला एखादा दिवस देवीच्या या जत्रेच्या वाट्याला येतो. मसुरे ,देऊळवाडा येथील श्रीदेवीमाउली ,बिल्वासची श्रीदेवीसातेरी आणि आंगणेवाडीची श्रीदेवीभराडी या तिघी बहिणी असून आंगणेवाडीच्या पठारावर तीन झाडे एकत्र उगवली आहेत .त्या ठिकाणी या तिन्ही देवता एकमेकींना भेटतात.हि जागा सातेरीची पेडी म्हणून प्रसिद्ध आहे.

सौजन्य -चैत्रपालवी वासंतिक विशेषांक २००३- श्री .विश्वनाथ मोरे